Pimpri : गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त पाकिस्तानमधून निघालेली यात्रा पिंपरीत

गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त पाकिस्तान आणि पंजाब येथील गुरुचे भारतभर भ्रमण

एमपीसी न्यूज- शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त पाकिस्तानातील नंनकांना साहेब या त्यांच्या जन्मस्थानावरून
निघालेली यात्रा आज पिंपरी येथील ग्यानीजी गुरुद्वारा येथे दुपारी साडेबारा वाजता पोहोचली. या यात्रेतील रथामध्ये गुरुनानक देवजी यांनी वापरलेले शस्त्र आणि गुरूग्रंथ साहेबजी,खडाव आणि इतर साहित्य ठेवण्यात आले आहे.

यावेळी पाकिस्तान आणि पंजाब येथील पाच गुरु भारतभर भ्रमण करून भारतातील गुरुद्वारांना भेट देणार आहेत. ५५० व्या जयंती निमित्त गुरुनानक देवजी यांनी वापरलेले शस्त्र आणि गुरूग्रंथ साहेबजी,खडाव आणि इतर साहित्य आहे. या साहित्याला शीख धर्मामध्ये विशेष महत्व आहे. पिंपरी गुरुद्वारा येथे हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी पिंपरी येथील शीख बांधवानी जोरदार तयारी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा फुलांची रास अंथरून स्वागत केले .पालखी साडेबारा वाजता पिंपरी गुरुद्वारा येथे दाखल झाली. फुलांची मुक्त उधळण करण्यात आली. “जो बोले सो निहाल — सत श्री अकाल ” असा जयघोष करत पालखीचे आगमन झाले. पिंपरी येथील गुरुद्वारा येथे गुरु ग्रंथ साहिब या त्यांच्या पवित्र ग्रंथांमधील प्रार्थना म्हणून झाल्यानंतर यात्रेने दुपारी पावणे दोन वाजता पुढे प्रस्थान ठेवले. आकुर्डी, देहूरोड, उल्हासनगर, मुंबई असे करत पूर्ण भारतभर यात्रा फिरणार आहे. अशी माहिती यात्रेचे आयोजक गुरुमुख सिंह यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.