Pimpri : हिरालाल शेख यांची सचिवपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज – भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियनच्या पिंपरी-चिंचवडच्या सचिवपदी हिरालाल गुलजार शेख यांची निवड करण्यात आली. त्यांना संघटनेचे अध्यक्ष विजय हरगुडे यांनी निवडीचे पत्र दिले आहे.

संघटनेच्या माध्यमांतून आपल्या नियुक्त कालावधीमध्ये असंघटित व असुरक्षित क्षेत्रातील सर्व आस्थापनांमधील कामगारांना तसेच कंपनीसह स्तरांतील, कामगाराना संघटित करुन त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तसेच माथाडी व कामगार कायद्याचे संरक्षण देत विविध लाभ संघटनेचे ध्येयधोरण विरोधात कोणतीही कृती होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे हिरालाल शेख म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.