Pimpri : शिक्षणतज्ञांकडून दहावीतील विद्यार्थ्यांचे टेन्शन गुल

एमपीसी न्यूज – दहावीचा बदललेला अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीबद्दल पालक, शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम आज मावळला. दहावी अभ्यासमाला कार्यशाळेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व गर्दी करीत शिक्षणतज्ज्ञांकडून दहावीतील यशाचा मंत्र आत्मसात केला. या कार्यशाळेतून पालकांच्या मनात अभ्यासक्रमाविषयी असलेल्या शंकादेखील दूर झाल्या. पाल्याकडून अभ्यास कसा करून घ्यावा, याचे तंत्रही त्यांना मिळाले. रोटरी क्लब ऑफ पुणे युवा, रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास, रोटरी क्लब ऑफ पुणे मिड इस्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे गणेशखिंड, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ, रोटरी क्लब ऑफ निगडी-पुणे,रोटरी क्लब ऑफ पुणे वारजे, रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्यावतीने सुपरमाईंड सक्सेस दहावी यशाचा मंत्र या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.

निगडी प्राधिकरण येथील मनोहार वाढोकार सभागृहात झालेल्या या एक दिवसीय दहावी अभ्यासक्रमाच्या कार्यशाळेचे उदघाटन रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे, नीलिमा डोंगरे, रोटरीयन मोहन पटवर्धन, एस. डी. वैदय, सुभाष म्हेत्रे, नंदकुमार अवचट, श्रीकांत जोशी, सुपरमाईंडचे मंजुषा वैद्य, अर्चिता मडके, दया कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  डॉ. जयश्री अत्रे- गणित ( एसएससी बोर्ड सदस्या), डॉ. सुलभा विधाते- शास्त्र  (एसएससी बोर्ड सदस्या), डॉ. गणेश राऊत – इतिहास (एसएससी बोर्ड सदस्य) अच्युत सोमण-इंग्रजी, रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी, रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे, नीलिमा डोंगरे, रोटरीयन मोहन पटवर्धन, एस. डी. वैदय, सुभाष म्हेत्रे, नंदकुमार अवचट, श्रीकांत जोशी, सुपरमाईंडचे मंजुषा वैद्य, अर्चिता मडके, दया कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सुरेश खरे म्हणाले विद्यार्थ्यांसह पालकांनाही दहावीची भीती बाळगण्याचे कारण नाही. आवश्‍यकतेनुसार काळानुरूप नवीन अभ्यासक्रम तयार केला.ज्ञानावर आधारित प्रश्‍न यापूर्वी परीक्षेला विचारले जात होते. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करता यावी, अशी नव्या अभ्यासक्रमाची रचना.आता विद्यार्थ्यांना विषय किती समजला, त्याचे आकलन कितपत झाले, यावर आधारित प्रश्‍न असतील. कृतिपत्रिकेत (पेपर) अभ्यासक्रमाबाहेरीलही प्रश्‍न दहावीच्या अभ्यासाचा दबाव पालकांनी मुलांवर टाकू नये.  नव्या अभ्यासक्रमानुसार सहावीपासून गणित विषयाचे फायनान्शिअल मॅपिंग केले आहे. अर्थकारण म्हणजे काय, गुंतवणूक कशी करावी, हे विद्यार्थ्यांना समजेल.

दहावीत ‘जीएसटी’ असला, तरी कोणत्या वस्तूवर किती कर लागू आहे, हे अपेक्षित नाही. केवळ जीएसटीची ओळख होऊन शेकडेवारीचे गणित अपेक्षित.संख्याशास्त्राला विशेष महत्त्व असून, मुलांनी त्याचा अभ्यास गांभीर्याने करावा. पाठ्यपुस्तकांवर आधारित पेपर असले, तरीही विद्यार्थ्यांना कोणत्याही पद्धतीने ते सोडविता येतील. विद्यार्थ्यांनी स्वत: केलेल्या ‘कन्सेप्ट मॅपिंग’ला विशेष महत्त्व.इयत्ता दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिकेकडून कृतिपत्रिकेकडे, ज्ञानाकडून आकलनाकडे, आशयाच्या आकलनाकडून भाषिक समृद्धीकडे आणि पाठांतराकडून स्वविचाराच्या अभिव्यक्तीकडे ही चार प्रमुख वैशिष्टय़े आहेत. पारंपरिक पाठांतर पद्धतीला फाटा देऊन विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती क्षमतेला संधी देणं हे या अभ्यासक्रमाचं वेगळेपण आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन पटवर्धन यांनी केले. सूत्रसंचालन सदाशिव काळे यांनी केले. सुरेश म्हेत्रे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.