Pimpri : महायुतीत कोणतीही नाराजी नाही,  मागीलवेळीपेक्षा जास्त मताधिक्यांनी निवडून येणार – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – पनवेल, उरणला महायुतीचा मेळावा झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही(Pimpri )मेळावा झाला आहे. सहाही विधानसभा मतदारसंघात सर्वजण एकजुटीने कामाला लागले आहेत. महायुतीमध्ये कोणतीही नाराजी नाही. मागीलवेळीपेक्षा यावेळी जास्त मताधिक्य असेल असा विश्वास मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.  ही देशाची निवडणूक असून नात्यागोत्यावर, भावनिक मुद्यावर होणार नसल्याचेही ते म्हणाले.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- (Pimpri )रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवडणूक प्रचाराबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद झाली.  आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, माजी खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, भाजपचे नेते सदाशिव खाडे, नामदेव ढाके, सुजाता पालांडे, शैला मोळक,  मोरेश्वर शेडगे, तुषार हिंगे, अनुप मोरे आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची निवडणूक होत आहे. दहा वर्षे विकासाची कामे केली आहेत. रेल्वेची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतले. पुणे-लोणावळा दरम्यान चौथा ट्रकचे काम लवकरच सुरू होईल. रेल्वे स्थानकांचा सुधार सुरू आहे.

Pimple Nilakh : अग्रगण्य फायनान्स कंपनीच्या नावाने साडेचार लाखांची फसवणूक

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील गाळ काढला. त्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढली. बोपखेल पुलाचा प्रश्न मार्गी लावला. रेडझोन हद्द कमी करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून त्याची फेरमोजणी झाली आहे. पवना, इंद्रायणी नदी सुधारचा प्रकल्प अंतिम झाला असून मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला आहे. नदीच्या उगमस्थानापासून नदी स्वच्छ केली जाणार आहे. त्यासाठी नदी काठच्या प्रत्येक गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मुळशी धरणातील पाणी आरक्षित ठेवले जाणार आहेत.

22 एप्रिल रोजी मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे अर्ज दाखल  करण्यासाठी येणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांची शहरात सभा होणार आहे.  उपमुख्यमंत्री पवार यांची मावळ तर  फडणवीस यांची पनवेलला सभा होईल. राज्यातील, केंद्रातील नेतेही सभेसाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.