Bhosari : गंभीर गुन्ह्यातील 8 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

खंडणी दरोडा विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आठ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. 7) भोसरी येथील चक्रपाणी वसाहतमध्ये करण्यात केली.

मंगेश सखाराम आंभोरे (वय 28, रा. संकल्प बिल्डींग, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस भोसरी एमआयडीसी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक किरण काटर यांना माहिती मिळाली की, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी मंगेश अंभोरे हा चक्रापाणी वसाहत येथील एका पानटवरीवर थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर 2010 आणि 2014 साली दोन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, अशोक दुधवणे, किरण काटकर, विक्रांत गायकवाड, सागर शेडगे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.