Wakad : कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या चिमुकल्याचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज – थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयाजवळ मोकळ्या मैदानात एका 3 ते 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह शुक्रवार (दि. 7) सांयकाळी साडेसहाच्या सुमारास आढळला होता. त्या चिमुकल्याचा निर्घृण खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे.

संतोष मंगल कार्यालयाजवळ अज्ञात चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याची माहिती नियंत्रण कक्षातून वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत अढळला. त्या मुलाच्या अंगावर हिरव्या निळसर रंगाचा टिशर्ट व लाल रंगाची हाफ पॅन्ट होती. त्याचा एक पाय प्राण्याने कुरतडला होता, तर त्याचे दोन्ही हात हे मनगटापासून कापून टाकले होते.

मृतदेहाचे शुक्रवारी शवविच्छेदन केल्यानंतर अहवालामध्ये मुलाच्या डोक्‍यात मारण्यात आले असून त्याचा तीन ते चार दिवसांपूर्वी खून करुन त्याला पुरले होते. मात्र प्राण्यांनी किंवा कुत्र्यांनी त्याला वर काढले व हा प्रकार उघडकीस आला. हा खून अंधश्रद्धा किंवा भिक मागण्यासाठीच्या हेतूने झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलसांनी वर्तविला आहे. दरम्यान वाकड पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावळी पोलिसांनी संबंधीत वर्णनाचा मुलाबाबात कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.