Pimpri: अवैध गुटखा वाहतूक, विक्रीवर कारवाई करा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध गुटखा वाहतूक आणि विक्री तत्काळ थांबविण्यात यावी. शहरात येणारा गुटखा रोखण्यासाठी शहराच्या सीमेवरील तपासणी कडक करावी. गुटखा विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे.

याबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना दिलेल्या निवेदनात शहराध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी म्हटले आहे की, शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात सर्रास गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी, खर्रा, मावासारखे पदार्थांची विक्री केली जात आहे. यामुळे शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढीच्या करिअरचा प्रश्न उपस्थित होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात येणारा गुटखा रोखण्यासाठी शहराच्या सीमेवरील तपासणी कडक करावी.

याचबरोबर अन्न व औषध प्रशासन विभाग, महापालिका आणि पोलीस असा एक ठोस कार्यक्रम हाती घेण्यात यावा. जेणेकरून पिंपरी-चिंचवड शहरातील गुटखा वाहतूक व विक्रीचा पूर्णपणे बिमोड होईल. याबाबतीत योग्य ती कारवाई न झाल्यास विद्यार्थी आणि समाजाच्या हितासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादी व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, नगरसेवक डब्बू असवानी, विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष उमेश काटे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष अक्षय शेडगे, आकाश मोरे, सूरज निंबाळकर, तेजस सिंग, परीक्षित कुलकर्णी, प्रसाद शेगडे, दामोदर बोऱ्हाडे असे अनेक विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.