Pimpri accident : पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलावर अपघात

एमपीसी न्यूज : पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलावर (Pimpri accident) आज शनिवारी सकाळच्या सुमारास अपघात घडला. टाटा सफारी कार पिंपरी उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून अडकल्याची घटना घडली आहे. सुदैवाने गाडी खाली पडली नसल्याने कुणीही जखमी झालेले नाही.

New Roop Laxmi Jewellers : दिवाळीची सुवर्ण खरेदी फक्त ‘न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स’मध्येच! नाममात्र मजुरी शिवाय लाखोंची बक्षिसे!

भाटनगरवरून पिंपरीच्या दिशेला जाणार्‍या रस्त्यावर एक काळ्या रंगाची सफारी कार उड्डाणपुलाला धडकल्याने हा अपघात झाला.सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.(Pimpri accident) ही गाडी उड्डाणपुलावरून खाली नं पडल्याने मोठा अनर्थ टळला.उड्डाणपूलाखालून ये-जा करणार्‍या नागरिकांना गंभीर दिखापत होण्याची शक्यता होती. या अपघातात गाडीचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना, अर्जुन पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक, चिंचवड वाहतूक विभाग यांनी सांगितले की एक, टाटा सफारी कार उड्डाणपुलावर बाजूला पार्क केली होती.(Pimpri accident) कार चालकाला जिम ला जायचे असल्याने त्याने कार चालू करताना चुकून ऍक्सेलेरेटर दाबला गेल्याने वेग वाढला व कार उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली. सिमेंट चे जाड व मोठे कठडे असल्याने कार धडकून अडकली.

हा अपघात आज सकाळी 7.30 ते 8 वा चे दरम्यान व्यंकटेश मार्केट जवळ घडला होता. उड्डाणपुलाच्या खाली घरे व दुकाने आहेत.(Pimpri accident) कार त्यांच्यावर पडली असती तर मोठी दुर्घटना होऊन माणसे जखमी झाली असती. वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. क्रेन बोलावण्यात आले आहे व कारला बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

छायाचित्रकार – मुकेश फेरवानी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.