Pimpri : मद्यपी नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – मद्यपी नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (प्रतिनिधी) दुपारी नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

चिंता दीपक सिंग (वय 30, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंता यांचा पती दीपक याला दारूचे व्यसन होते. तो सतत दारू पित असल्याने चिंता यांचा त्याला विरोध होता. याच कारणावरून चिता यांनी गुरुवारी दुपारी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.