Pimpri : पिंपरी-चिंचवड मधील लघु उद्योजकांची मंगळवारी बैठक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना व पवना औद्योगिक वसाहत यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योगासमोरील समस्या व तोडगा यावर मंगळवारी (दि. 18) बैठक होणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली.

पिंपरीतील पवना औद्योगिक वसाहत सोसायटीच्या सभागृहात दुपारी दोन वाजता ही बैठक होणार आहे. यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष संदीप जोशी मार्गदर्शन करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.