Pimpri : मोरवाडीत रविवारी काव्यांजलीच्या कार्यक्रमातून अटलजींना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम मासिक पुण्यतिथी निमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भाजपच्या वतीने ‘काव्यांजली’ कार्यक्रम होणार आहे. अटल बिहारी यांनी लिहिलेल्या कवितांचे अभिवाचन करण्यात येणार आहे.

मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात उद्या, रविवारी (दि. 16) हा कार्यक्रम होणार आहे. त्याच बरोबर दि. 17 ते 25 सप्टेंबर दरम्यान सेवा सप्ताह म्हणून पाळला जाणार आहे. विविध प्रभागात या निमित्त स्वच्छता मोहित इ आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. शहरातील साहित्यिक, कवी या कार्यक्रमात वाजपेयींच्या कवितांचे वाचन करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.