Bhosari: भोसरीत गोडाऊन फोडून 78 हजाराचे साहित्य लंपास

एमपीसी न्यूज – शटर व दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गोडाऊन मधील 78 हजार रूपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना गुरूवारी (दि.13) रात्री भोसरी येथे घडली.

सचिन कालीदास एकाड (वय 37, रा. केसरगंधा हौसिंग सोसायटी, मोशी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाड यांचे भोसरीत गोडाऊन आहे. चोरट्यांनी गुरूवार रात्री गोडाऊनच्या शटरचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून 78 हजार रूपयांचे साहित्य चोरून नेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.