Hinjwadi: रिक्षा चालकाने प्रवाशाला लुबाडले

एमपीसी न्यूज – रिक्षा चालक व त्याच्या साथीदाराने रिक्षातील प्रवाशाचा मोबाईल व रोकड असा 30 हजार रूपयांची लुबाडणूक केली. ही घटना वाकड येथील भुमकर चौकात गुरूवारी दुपारी (दि.14)चार वाजता घडली.

दिपू छोटेलाल वर्मा (वय 34, रा. बंटी साखरे चाळ, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षा चालक व त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वर्मा गुरूवारी दुपारी चार वाजता वाकड येथून एका रिक्षात बसले होते. रिक्षा भुमकर चौकात आल्यानंतर आणखी एक जण रिक्षात बसला. रिक्षा चालक व त्याचा साथीदार फिर्यादीकडून जबरदस्तीने मोबाईल व रोकड असा 30 हजार रूपयांचा ऐवज लुबाडून वाकड चौकाच्या दिशेने पसार झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.