Sangavi: मोटार चालकाकडून गावठी कट्टा जप्त

एमपीसी न्यूज – गावठी कट्टा व एक काडतुस बाळगणा-या मोटार चालकाला सांगवी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.14) सायंकाळी सात वाजता सांगवी येथे करण्यात आली.

उमेश सुरेश पवार (वय 29, रा. निगडे गिरणी, यशवंतनगर, येरवडा) असे अटक केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई दीपक गुणवंत पिसे (वय 28) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी पवार हा एक गावठी कट्टा व एक काडतूस घेऊन सांगवी भागात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व एक काडतुस जप्त करून त्याला अटक केली. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.