Pune : इंधन दरवाढीचे विघ्न टळता टळेना ! ; पेट्रोल 35 पैसे तर डिझेल 24 पैशानी महागले

एमपीसी न्यूज- रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने होत आहे. त्यामुळे आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल 35 पैसे तर डिझेल 24 पैशांनी महाग झालं आहे. पुणे शहरात पेट्रोलचा आजचा दर प्रतिलिटर 88.88 रुपये तर डिझेलचा दर 76.75 रुपये झाला आहे.

पुण्यात शुक्रवारी 88.53 रुपये दराने मिळणारे पेट्रोल आजपासून 88.88 रुपयांनी विकले जात आहे. तर डिझेलच्या भावात आजपासून 24 पैशांची वाढ होऊन डिझेलचा दर 76. 75 रुपये झाला आहे. दिवसेंदिवस इंधन दरात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढीचे विघ्न दूर करण्याचे साकडे गणपती बाप्पाकडे घातले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.