Pimpri : पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार(Pimpri) असोसिएशनच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पिंपरी नेहरूनगर न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आर एस वानखेडे, न्यायाधीश एन आर गजभिये, न्यायाधीश आर एम गिरी, न्यायाधीश एम जी मोरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड नारायण रसाळ, माजी अध्यक्ष ॲड संजय दातीर पाटील, ॲड सुहास पडवळ, ॲड सुदाम साने, ॲड विलास कुटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी ॲड अल्पना रायते, ॲड अरुण खरात, सचिव ॲड गणेश शिंदे, महिला सचिव ॲड प्रमिला गाडे, सह सचिव ॲड मंगेश नढे, हिशोब तपासनीस ॲड राजेश रणपिसे, सदस्य ॲड स्वप्नील वाळुंज, ॲड सौरभ जगताप, ॲड अक्षय केदार, ॲड नितीन पवार, ॲड पवन गायकवाड आदी उपस्थित होते.

Maharashtra News : पावसाळ्यात विजेच्या संकटापासून सतर्कतेसाठी ‘दामिनी’

निलांजन चंद्रकांत माने, तन्मय गजानन धायगुडे, जान्हवी विजय रोडे, श्रावणी विनोद काळभोर, निल सचिन राऊत, तनिष्का धमाजी लांडगे, नेहा दिलीप शिंगोटे, व्हिक्टोरिया बिटो जॉन, सिद्धेश जयदीप सिसोदिया, कार्तिक महेश भापकर, हर्षवर्धन वैभव मोहिते, श्रुती सत्यन नायर, निहिरा सुनील कडूसकर, दुरप्श समशेर मोमीन, श्रेयस संभाजी कुंभार या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. वकिलांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केल्याबद्दल न्यायधीशांनी बार असोसिएशनचे कौतुक केले.

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या विदयमान उपाध्यक्षा ॲड जयश्री विलास कुटे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड प्रशांत बचुटे यांनी आभार (Pimpri) मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.