Pimpri : ‘नाम’ फाउंडेशन कडून पीएम आणि सीएम निधीसाठी प्रत्येकी पन्नास लाखांची मदत

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी मदतीसाठी केलेल्या आवाहनाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. रतन टाटा, मुकेश अंबानी, जिंदाल आणि मोठमोठे अभिनेते पुढे येऊन या निधीसाठी भरघोस मदत करत आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी काम करणारी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ फाउंडेशने पीएम आणि सीएम मदत निधीसाठी प्रत्येकी 50 लाखांची मदत देऊ केली आहे. 

अभिनेते नाना पाटेकर यांनी याबाबत घोषणा करताना म्हटले प्रत्येकाने जात-पात-धर्म विसरून पुढे येऊन या कामासाठी मदत केली पाहिजे. सरकार आपल्या परीने या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करतच आहे तरीसुद्धा या संकटाला सरकार एकटं तोंड देऊ शकणार नाही तेव्हा शक्य तेवढ्या परीने प्रत्येकाने या कामासाठी मदत करावी. असे आवाहन त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.