Nana Patekar : ब-याच काळानंतर नाना पाटेकर साकारणार प्रसिद्ध गुप्तहेर

After a long time, Nana Patekar will become a famous spy

एमपीसी न्यूज – गुप्तहेरांच्या दुनियेबद्दल सगळ्यांनाच कुतुहल असते. त्यांचे काम कशा पद्धतीने चालते, ते काय काय करामती करतात याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. याआधी हॉलिवूडमध्ये गुप्तहेरांच्या कारवायांवर आधारलेले अनेक रहस्यपट येऊन गेलेले आहेत.

‘रॉ’ म्हणजे रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग या भारतीय गुप्तहेर संघटनेचे संस्थापक आणि पहिले प्रमुख रामेश्वरनाथ काव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आणि वेब सीरिजची निर्मिती चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवाला करणार आहेत. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आर. एन. काव यांची भूमिका साकारणार आहेत. मीटूच्या आरोपानंतर हा नाना पाटेकरांचा कदाचित पहिला प्रोजेक्ट आहे. तनुश्री दत्ताच्या आरोपानंतर नाना यांना ‘हाउसफुल 4’ पासून वेगळे करण्यात आले होते.

खरं तर या वर्षाच्या सुरुवातीला करण जोहर आणि निर्माता सुनील बोहरा यांनीही काव यांच्या आयुष्यावर चित्रपट आणि वेब सीरिज बनवणार असल्याचे जाहीर केले होते. पण आता नाडियादवाला या प्रोडेक्टवर काम करत आहेत. या संबंधी बोलताना फिरोज नाडियादवाला म्हणाले, ‘आम्ही या प्रोजेक्टवर गेल्या पाच वर्षांपासून काम करत आहोत. प्रथम आम्ही काव यांच्या आयुष्यावर आधारित 20 भागांची वेब सीरिज बनवू आणि त्यानंतर चित्रपट. यासाठी संपूर्ण कास्ट फायनल झाली आहे. चित्रपटाची आणि वेब सीरिजची कास्ट एकच राहील’. या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. काव यांच्या जीवनाचे काही भाग, रॉची निर्मिती आणि काही खास ऑपरेशन्स पडद्यावर दाखवले जातील.

अभिनेते नाना पाटेकर यांचे या चित्रपटाच्या निमित्ताने ब-याच कालावधीनंतर पुनरागमन होईल. या आधी त्यांनी अनेक चित्रपटात करारी पोलिस अधिकारी रंगवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.