Pimpri : सिमेंटच्या जंगलात नंदीबैल मालकाचे अस्तित्व धोक्यात

पारंपारिक रूढी परंपरा नष्ट होण्याच्या मार्गावर

एमपीसी न्यूज – सिमेंटच्या जंगलात नंदीबैल मालकाचे अस्तित्व धोक्यात आले ( Pimpri ) आहे. पारंपारिक रूढी परंपरा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची भीती सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड यांनी व्यक्त केली.

नंदी बैल हा शिवाचे पवित्र वाहन म्हणून समजले जाते याला पांगुळ बैल ही म्हणतात. महाराष्ट्रात जुन्या परंपरा जपणारे नंदीबैलवाले हे भटकंती करून उदरनिर्वाह करणारी जमात आहे. बैलाचा खेळ दाखवून, भविष्य सांगून पोट भरणारी जमात आहे. नंदीवाले पाटील, ढवळा नंदीवाले, कोमटी नंदीवाले, भांडे विकणार नंदीवाले, या चार प्रकारात नंदीवाल्यांचा समाज विखुरला गेला आहे. नंदीबैलाला रंगवून, सजवून ,गावाच्या  घरोघरी अंगणामध्ये आणला जातो. संबळीचा सुर तर कधी कधी तुंणतूने किंवा ढोलकी वाजवून गुबू गुबू  असे म्हणत नागरिकाची करमणूक  करून रुढीपरंपरा जपतात.

“महादेवाचा नंदी आला दारात “असे म्हणत दारोदारी फिरतात, बऱ्याच महिला हळद-कुंकू वाहून नंदीबैलाचे पाय धुतात  व धान्य देतात त्यावेळेस मालकाच्या अज्ञेप्रमाणे नंदी बैल डोके खालीवर करतो व वलख म्हटले कि बैल नको नको म्हणतो ,मोटवळे म्हणताच बैल गुडघे टेकून खेळतो ,लहान मुलांच्या अंगावर अलगद पाय ठेवतो. माणसाप्रमाणे वागतो, हा नंदीबैल तेरा वर्षाचा असून 900 किलो वजन आहे, त्याला सांकेतिक भाषा शिकवली जाते.

यावेळी अण्णा जोगदंड म्हणाले की सिमेंटच्या जंगलात माणुसकी लुप्त होत चालली आहे. अशा जमातीला शहरी भागात पोटापुरते अन्नधान्य मिळणे कठीण झाले आहे. पारंपारिक कला ,रूढी परंपरा जपल्या पाहिजेत नाहीतर पुढच्या तरुणाईला चित्रातूनच नंदीबैल बघावा लागेल.

नंदीबैल मालक भगवान कानडे म्हणाले की आम्ही वर्षभर भटकंती करत असतो. जवळपास चार-पाच जण एका नंदीबैला बरोबर फिरत असतो. यावेळी अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज, शिर्डी, आळंदी करून आम्ही बालाजीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितली. आमच्या पुढच्या पिढीचा शिक्षणा अभावी गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अन्नधान्य मिळानासे झाले ( Pimpri )आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.