Nigdi : मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज –  पी.ई.एस.एस मॉडर्न प्री-प्रायमरी, प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल यमुनानगर निगडी येथील (Nigdi) शाळेमध्ये  मंगळवारी (दि.5) सप्टेंबर शिक्षक दिन  अतिशय उत्साहात आणि उत्कृष्टपणे साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाची रूपरेषा शिक्षकांद्वारे आखण्यात आली होती व कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन  इयत्ता 1 ते 4 थी च्या विद्यार्थ्यांनी केले होते.शिक्षक दिनानिमित्त अनेक विद्यार्थी शिक्षक हे बनले होते व त्यांनी  इतर वर्गांमधील विद्यार्थ्यांना शिकवले. आणि उर्वरित विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांना सहकार्य केले.

शाळेच्या सभागृहांमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली व मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुण्यांचे पुष्प आणि शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

Pimpri : ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक पालक कार्यशाळा

शिक्षक दिन या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असल्या कारणाने शाळेमध्ये त्यांची जयंती साजरी करण्यात आली.शिक्षक दिनानिमित्त शाळेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला भरघोस असा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. ओवी पाटील , शौर्या सावंत, आणि सुयश सावंत यांनी शिक्षकांबद्दल मनोगत व्यक्त केले.या स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय  आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन  त्यांचा आशिर्वाद घेऊन  शिक्षक दिन साजरा केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वाती देशपांडे आणि आभार प्रदर्शन स्मिता तिकोने ह्यांनी केले.या कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन प्रो. शामकांत देशमुख व यशवंत कुलकर्णी ह्यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच शाळेचे व्हिजिटर डॉ. प्रो. अतुल फाटक व मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे ह्यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला .

संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे व  सहकार्यवाह ज्योस्त्ना एकबोटे यांचे मार्गदर्शन (Nigdi) लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.