Pimpri News: शहरात आज 509 नवीन रुग्ण, 474 जणांना डिस्चार्ज, 12 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 490 आणि पालिका हद्दीबाहेरील 19 अशा 509 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 82 हजार 993 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 474 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 7 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 5 अशा 12 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.

त्यात निगडी, मोशी, कासारवाडी, पुनावळे, चिंचवड, पिंगळेनिलख, चिखली, आंबेगाव, देहूगाव, सातारा, सोलापूर, धायरी येथील रुग्णांचा मृत्यू झाला.

शहरात आजपर्यंत 82 हजार 993 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 77 हजार 237 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1412 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 545 अशा 1957 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 2835 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.