Pimpri News: औद्योगिकनगरीत भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. 73 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

आयुक्त राजेश पाटील, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, शैलेंद्र मोरे, माजी महापौर योगेश बहल , अपर्णा डोके, नगरसदस्या मिनल यादव, शर्मिला बाबर , सुजाता पालांडे, माजी नगरसेवक गोविंद पानसरे, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, विकास ढाकणे, उल्हास जगताप , कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, स्वीकृत सदस्य सुनिल कदम, यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने मोरवाडी येथील पक्ष कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, प्रदेश सचिव अमित गोरखे, नवनगर विकास प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, बाबू नायर, महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, सुप्रिया चांदगुडे, सुर्यकांत गोफणे, महादेव कवितके, वैशाली खाड्ये, देवदत्त लांडे, राजेंद्र ढवळे,निखील काळकूटे, संजय पटनी, संजय परळीकर, नीलम हुले, कैलास सानप, तेजस्विनी कदम, हेमंत देवकुळे, किरण पाटील, संजय शेंडगे, हिना मुलाणी, पूजा आल्हाट, अंजली पांडे, दिपाली कारंजकर, कोमल शिंदे, कविता करदास, सुनील कदम, प्रदीप बेंद्रे, फारूक इनामदार, अभिजित भलशंकर आदी उपस्थित होते.

नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल संभाजीनगर चिंचवड येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी भारत मातेचे पूजन करून ध्वजारोहण केले. याप्रसंगी समीर जेऊरकर, प्राचार्य मानसी हसबनीस उपस्थित होते. ऑनलाइनद्वारे दीड हजार पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑनलाइनद्वारे काही नृत्य, कथा, विविध कला प्रदर्शन केले गेले.

73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चर्‍होली येथील मुलाणी मस्जिदच्या प्रांगणात अहेले सुन्नत्वल जमात मुलाणी मस्जिद व मौलाना आझाद सोशल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वृक्षारोपण, रोपांचे वाटप, मास्क-सॅनिटायझर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच सफाई कामगार, डॉक्टर, परिचारिका आदींचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष रामा सुरेश भोरखडे, पिंपरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, डॉ. कीर्ती गायकवाड, डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य परिचारिका सरला चव्हाण, उद्यान विभागाचे अधिकारी गोरख गोसावी आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष रामा सुरेश भोरखडे यांच्या मार्गदर्शनखाली या सर्व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.