Chinchwad News : पिंपरी-चिंचवडच्या कपिल शेळके यांनी विकसित केलेल्या स्वदेशी इलेक्ट्रिक बाईकचे लॉन्चिंग; रतन टाटा यांनी केले फंडिंग

kratos देतेय ओलाच्या इलेक्ट्रिक बाईकला टक्कर

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडचे रहिवासी असलेल्या कपिल शेळके यांनी स्वदेशी इलेक्ट्रिक बाईकची (kratos) निर्मिती केली आहे. ही बाईक ओलाच्या इलेक्ट्रिक बाईकला मागे सारून आपल्या आकर्षक आणि उत्तम फिचरमुळे चर्चेत आली आहे. कपिल शेळके यांनी बनवलेल्या Tork Motors च्या Kratos आणि Kratos R या दोन बाईक व्हेरिएन्ट प्रजासत्ताक दिनानिमित्त (26 जानेवारी 2022) लॉन्च केले आहेत.

ओला आणि सिम्पल एनर्जी या दोन कंपन्यांनी भारतात स्वातंत्र्य दीनादिवशी आपल्या इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च केल्या होत्या. या स्कुटरला तोडीस तोड आली असून Tork Motors ने आपल्या दोन Kratos आणि Kratos R या दोन इलेक्ट्रिक बाईक प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय बाजारात लॉन्च केल्या आहेत.

Kratos आणि Kratos R या इलेक्ट्रिक बाईक https://booking.torkmotors.com/ या वेबसाईटवरून बुकिंग करता येणार आहे. दोन्ही बाईकची डिलिव्हरी एप्रिल पर्यंत करण्यात आली आहे. कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 999 रुपयांमध्ये बुकिंग करता येणार आहे.

नवीन Tork Kretos Electric Vehicle ला टप्प्याटप्प्याने भारतभर उपलब्ध केले जाणार आहे. सुरुवातीला पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि दिल्ली या शहरांमध्ये मिळेल. या बाईकची किंमत पुणे शहरात एक लाख 92 हजार 499 रुपये एवढी आहे. त्यातून FAME II सबसिडी 60 हजार रुपये आणि स्टेट सबसिडी 24 हजार 500 रुपये मिळणार असल्याने पुणे शहरातील या बाईकची एक्स शोरूम किंमत एक लाख सात हजार 999 एवढी राहील.

Home

ही आहेत Tork Motors च्या EV ची वैशिष्ट्ये –

Kratos मध्ये 48 V ची IP 67 रेटेड 4 Kwh लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. याची रेंज 180 किलोमीटर आहे. तर रियल वर्ल्ड रेंज ही 120 किमी आहे. ही मोटारसायकल 100 किमी प्रतितास एवढ्या वेगाने धावू शकते. यात एक्सियल फ्लक्स टाईप इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. चार सेकंदात ही मोटारसायकल 40 किमी प्रति तासाचा वेग पकडते. Kratos R मध्ये अधिक क्षमतेची मोटर आहे. याचा टॉप स्पीड 105 किमी प्रति तास आहे. फास्ट चार्जिंगची सुविधा केवळ Kratos R मध्ये देण्यात आली आहे. तसेच जियोफेसिंग, फाईंड माय व्हेईकल फिचर, मोटर वॉक असिस्ट, क्रॅश अलर्ट, व्हेकेशन मोड, ट्रॅक मोड आदी सुविधा देण्यात आल्या आहेत.

Kratos च्या निर्मात्याविषयी

Tork Motors ची Kratos ही इलेक्ट्रिक बाईक स्वदेशी आहे. पिंपरी चिंचवडचे रहिवासी असलेले कपिल शेळके यांनी ही बाईक बनवली आहे. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट अँड्र्यूज चिंचवड या शाळेत झाले. तसेच अभियांत्रिकीचे शिक्षण आकुर्डी येथील डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमधून झाले. शालेय जीवनापासून शेळके यांना बाईकची आवड होती. ती आवड त्यांनी बाईक निर्मिती क्षेत्रात बदलली आणि ही बाईक तयार केली आहे. दरम्यान त्यांना या बाईकसाठी स्वतः रतन टाटा यांनी फंडिंग केले आहे. पिंपरी चिंचवडकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.