Chinchwad News : नोव्हेल सर्कलचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुशोभिकरण केलेल्या नोव्हेल सर्कल चौकाचे लोकार्पण करण्यात आले.

नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल तर्फे बर्ड व्हली उद्यानासमोरील चौकाचे “व्यावसायिक सामाजिक जबाबदारी ” (CSR) अंतर्गत सुशोभिकरण करण्यात आले. या सुशोभीकरणाअंतर्गत बसविण्यात आलेल्या शिल्पाला “आरोहण” असे संबोधन्यात आले असून त्याद्वारे मुलींच्या शिक्षणा संदर्भात योग्य व अचुक असा संदेश नागरिकांना दिला जात आहे.

बदलत्या काळात जर मुलींना आपले आयुष्य घडवायचे असेल तर शिक्षण हीच खरी त्यांची ताकद आहे.  त्याद्वारे ते एखाद्या पक्षाप्रमाणे स्वछंदीपणे उंच भरारी घेउन आपले भविष्य उज्वल करु शकतात, असे अमित गोरखे म्हणाले. शिल्पची रचना व निर्मिती पुणे येथील प्रसिध्द शिल्प्कार वैशाली कागदे व उल्हास कागदे यांनी केलेली आहे.

शिल्पाच्या उदघाटन प्रसंगी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे, महापौर उषा  ढोरे, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक तुषार हिंगे , विलास जेउरकर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे,पक्षनेते नामदेव ढाके, अमोल थोरात, नगरसेवक कुंदन गायकवाड, समीर जेऊरकर, दीपक भोजने आदी  उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.