Pimpri News : बुध्द जयंती निमित्त आंबेडकरी जलसाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज़- भीमशक्ती सामजिक संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, तथागत गौतम बुध्द जयंती निमित्त पिंपरी येथे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक ,पुण्याचा राघु फेम राहुल शिंदे आणि सुप्रसिद्ध गायिका राखी रोहम यांचा आंबेडकरी जलसाचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदान, पिंपरी चौक, या ठिकाणी मोठया जल्लोषात (Pimpri News)संपन्न झाला.

Pune : छे छे मी त्यांना उत्तरच देत नाही – आदित्य ठाकरे

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मॅक्स भैनवाल,अमित चंदा व भिमटोला मित्र मंडळाचे अध्यक्ष निखिल जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिं.चिं.अध्यक्ष इम्रान शेख, शिवसेना युवा सेनाचे नेते अभिजित गोफण हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन पंकजभाऊ वाघमारे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.यावेळी  राहुल शिंदे, पंकजभाऊ वाघमारे व सुरजभाऊ गायकवाड यांच्या हस्ते महापुरुषांच्या(Pimpri News) प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 

तसेच पैलवान छबुलाल आहेर यांना त्यांच्या पैलवानकीच्या कारकीर्दीबद्दल मरणोत्तर “भीमशक्ती गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच शहरातील पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे विजय जगताप, लक्ष्मण रोकडे, शफीक शेख, सुरज साळवे, विकास कडलक, दिलीप देहाडे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.

 

कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहरामधील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते धीरज वानखेडे, राजन नायर, प्रा. प्रमोद डोंगरदिवे, विजय मसुरे, विद्या जाधव, प्रतिभा बनसोडे, परमेश्वर निसरगंध, सिद्धू कांबळे, गौतम गायकवाड, समर्थ जाधव, रामभाऊ ठोके, माऊली बोराटे, लालासाहेब गायकवाड, शिवाजी झोडगे, अरूण मोराळे, राजू सरवदे, ऋषीमुनी लोखंडे, लक्ष्मण पांचाळ(Pimpri News) तसेच उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरजभाऊ गायकवाड यांनी केले  तर (Pimpri News) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज भास्कर  यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.