Pimpri News : शहर भाजपच्या प्रवक्तेपदी अमोल थोरात यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांची महानगर प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अमोल थोरात भाजपामध्ये कार्यरत आहेत. पक्ष संघटनासाठी त्यांनी योगदान दिले आहे. तसेच, जिल्हा संघटन सरचिटणीस म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याची दखल प्रदेश नेतृत्त्वाने घेतली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमोल थोरात यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. तसेच, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी थोरात यांचे अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.