Pimpri News : प्राधिकरणाच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 18 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सेक्टर 12 येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एलआयजी (LIG) व ईडब्लूएस (EWS) गृहप्रकल्पातील सदनिकासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. आज (दि.30 मार्च) या योजनेसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिवस होता. पण, नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार अर्ज नोंदणीला 18 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्राधिकरण कार्यालयामार्फत याबाबत प्रसिद्धी पत्रक काढले आहे. त्यानुसार प्राधिकरणाच्या सेक्टर 12 येथील गृहप्रकल्प योजनेसाठी 18 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर, सोडतीसाठी 19 एप्रिलपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरता येईल.

_MPC_DIR_MPU_II

या गृहप्रकल्पाची सोडत 7 मे रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येईल, असे प्राधिकरण कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

प्राधिकरणाच्या या गृहप्रकल्पासाठी 26 हजार नागरिकांनी नोंदणी केली असून, वीस हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पूर्वीच्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

अटी व शर्तीसाठी प्राधिकरण कार्यालयाचे संकेतस्थळ www.pcntda.org.in अथवा lottery.pcntda.org.in या संकेतस्थळावर माहितीपत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, याच संकेतस्थळावरुन गृहप्रकल्पासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.