Pimpri News: ‘पीएमपी’च्या पिंपरी आगारातील रक्तदानाला मोठा प्रतिसाद, 421 रक्त पिशव्यांचे संकलन

एमपीसी न्यूज – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता पीएमपीएमएलच्या निगडी, पिंपरी, भोसरी या आगारांमध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 873 जणांनी रक्तदान केले. यामध्ये सर्वाधिक 421 रक्त पिशव्यांचे संकलन पिंपरी आगारातून झाले.

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी सामाजिक जाणिवेतून कोरोना प्रादुर्भावच्या परिस्थितीत महामंडळास समाजाप्रती असणारे उत्तरदायीत्व निभावण्याच्या भावनेने महामंडळामार्फत रक्तदान शिबिर घेतले. पुणे शहरातील 40 रक्तपेढ्यांच्या सहयोगाने महामंडळाच्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 13 आगार व दोन मुख्य कार्यालयामध्ये हे शिबीर घेण्यात आले. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 15 शिबिरांमध्ये 4 हजार 249 जणांनी रक्तदान केले.

याप्रसंगी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप, उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समीती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे, सहव्यवस्थापकीय संचालिका डॉ. चेतना केरुरे, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, सिने अभिनेत्री पुजा रेड्डी, रक्ताचे नाते चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड, राष्ट्रवादी युनियनचे गणेश गोलांडे, रिपब्लिकन ब्रिगेड संघटनेचे नानासाहेब सोनवणे, पिंपरीचे झोनल मॅनेजर तथा आगार व्यवस्थापक संतोष माने, आगार अभियंता राजकुमार माने, भोसरी बीआरटी स्थानक प्रमुख काळुराम लांडगे, ट्रॅफिक इन्सपेक्टर मिलिंद शेवाळे, ट्रॅफिक इन्सपेक्टर शिलरत्न बाणे, टाईम किपर प्रदीप धर्म, दिलीप गायकवाड, प्रकाश मोकाशी, विष्णु रायकर, राजाराम थोरवे, जयसिंग यादव, शंकर काळभोर, विजय किंडरे, हरिष सरवदे, गणेश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आर्ट ऑफ लिव्हींगचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी आगारचे झोनल मॅनेजर तथा आगार व्यवस्थापक संतोष माने यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.