Pune Corona News : पुणे शहराच्या मध्यवस्तीतील कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर

एमपीसीन्यूज : पुणे शहराच्या मध्यवस्तीमधील दाट लोकवस्ती असलेल्या भवानी पेठ, ढोले पाटील रोड, शिवाजीनगर-घोले रोड आणि कसबा विश्रामबाग या चार क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीत सक्रिय रुग्णाची संख्या खुप कमी झाली असून त्या ठिकाणी अवघे 47 सक्रिय कोरोना बधित आहेत. या ठिकाणी फक्त 5 प्रतिबंध क्षेत्र उरली आहेत. त्यामुळे शहराच्या मध्यवस्तीतील कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या पाहिल्या लाटेत शहरातील मध्यवर्ती भाग हा कोरोनाचा हॉट स्पॉट बनला होता. झोपडपट्टी आणि दाट लोकवस्ती असलेल्या या भागात सर्वाधिक रुग्ण होते. दुसऱ्या लाटेत मात्र काहीसं उलट चित्र पाहायला मिळालं. 80 बाधित रुग्ण हे इमारती आणि सोसायट्यांमधील होते. त्यामुळे दुसऱ्या लाटेत भवानी पेठ, ढोले पाटील रोड, शिवाजीनगर-घोले रोड आणि कसबा विश्रामबाग कार्यालयाच्या हद्दीत तूलनेने बधितांची संख्या किमी आहे.

सध्या शहरात रोज 500 नवे बाधित रुग्ण आढळून येत असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. महापालिकेच्या आकडेवारी नुसार गेल्या आठवड्यात रुग्णसंख्या वाढीत भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. त्याठिकाणी अवघे ३ रुग्ण आहेत.

त्यापाठोपाठ ढोले पाटील रोड येथे 12  रुग्ण, कसबा- विश्रामबाग 14  रुग्ण, शिवाजीनगर घोले रोड येथे 18 रुग्ण, वानवडी रामटेकडी येथे 17 रुग्ण अशा उलट्या क्रमाने रुग्णांचा समावेश आहे.

तर सार्वधिक रुग्ण हे उपनगरात असून हडपसर-मुंढवा 61  रुग्ण , येरवडा- कळस- धानोरी येथे 58  रुग्ण आणि नगर रोड वडगावशेरी 45 रुग्ण तर औंध येथे 49  रुग्ण असून या क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत रुग्णसंख्या वाढीचा वेग कायम आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.