Pune Corona News : गुड न्यूज ! शहरातील 90 टक्के कोविड सेंटर झाली रिकामी

एमपीसीन्यूज : पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव काम झाला असून रुग्ण संख्या देखील मोठ्या प्रमाणात घटली आहे. शहरातील विलीगीकरण केंद्रात ( कोविड सेंटर) पंधरवड्यापूर्वी असलेली दोन हजार 180  रुग्णसंख्या आज 227  पर्यंत घटली आहे. कोरोना बाधितांमधील सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी महापालिकेची 2  हजार 736 पर्यंत कमी झाले आहेत.

शहरात 25  मार्चला विलीगीकरण केंद्रांमध्ये साडेचारशे बेड होते. त्यावेळी 207  बेडवर रुग्ण उपचार घेत होते. एप्रिलअखेरीला बेडची संख्या एक हजार 317  पर्यंत वाढली. त्यावेळी 998  बेड भरले होते. 13  मे रोजी महापालिकेच्या व खासगी कोविड केअर सेंटरमध्ये तीन हजार 608 बेड उपलब्ध होते. त्यापैकी दोन हजार 180 बेडवर रुग्ण होते, तर एक हजार 428  बेड रिकामे होते. आज सुमारे साडेतीन हजार बेड म्हणजे जवळपास 90  टक्के बेड रिकामे आहेत.

पालिकेने अनेक विलीगीकरण केंद्र बंद केली असून सध्या महापालिकेतर्फे सध्या गंगाधाम, खराडी, संत ज्ञानेश्‍वर वसतिगृह, हडपसर येथील बनकर आणि एसएनडीटी येथे विलगीकरण केंद्र सुरू आहेत. या पाच केंद्रात मिळून सुमारे दीड हजार बाधितांना ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, सध्या या ठिकाणी 227  जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

सौम्य लक्षणे असलेले रुग्ण विलीगीकरण केंद्रत ठेवले जातात. त्यांना औषधे दिली जातात. महापालिकेच्या केंद्रामध्ये एक हजार 550  बेड आहेत. खासगी रुग्णालये व संस्थांच्या एकूण 34  विलीगीकरण केंद्रामध्ये एक हजार 997 बेडची व्यवस्था होती. महापालिकेच्या सेंटरमध्ये आता अडीचशेपर्यंत रुग्ण आहेत. खासगीमध्ये दोनशेच्या आसपास रुग्ण आहेत. अनेक खासगी केंद्रे रुग्ण नसल्यामुळे बंद झाली आहेत.

घरी राहून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या एप्रिलमध्ये खूप वाढली होती. 18  एप्रिलला सर्वाधिक 47  हजार 329  रुग्ण गृह विलगीकरणात होते. लॉकडाउनच्या काळात संसर्ग कमी होत गेल्याने, सौम्य लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची संख्या घटली. घरी असलेल्या रुग्णांची संख्या आज चार हजार 681 पर्यंत कमी झाली आहे. तर रुग्णालयात दोन हजार 736  रुग्ण उपचार घेत आहेत अशी महापालिकेचे सहायक आरोग्याधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.