Pimpri News : आपच्या कार्याध्यक्षपदी चेतन बेंद्रे यांची निवड

एमपीसी न्यूज – आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी  कार्याध्यक्ष पदावर चेतन  बेंद्रे यांच्या नियुक्तीची घोषणा आपचे महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केली.

आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकदीने उतरत असल्याचे जाहीर करत चेतन बेंद्रे यांची निवड राज्य समिती करत असल्याचे धनंजय शिंदे यांनी सांगितले.

आपल्या नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना चेतन बेंद्रे म्हणाले की, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या महापालिकेच्या आत्तापर्यंतच्या कारभारात कोणताही पक्ष सत्तेत आला तरी सत्तेतील लोक बदललेले नाहीत. यामुळे जनतेच्या कल्याणासाठी नव्हे, तर टक्केवारीसाठीच सत्तेचा वापर महापालिकेत होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी आप या निवडणुकीमध्ये उतरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.