Hinjawadi Crime News : प्लॉट खरेदी करुन देण्याच्या बहाण्याने 72 लाखांची फसवणूक करणा-या आरोपीचा कोरोनाने मृत्यू

एमपीसी न्यूज – प्लॉट खरेदी करुन देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तिने सात जणांकडून तब्बल 72 लाख 14 हजार रुपये टोकन म्हणून घेतले. त्यानंतर पैसे घेणा-या व्यक्तिने सात जणांना प्लॉट खरेदी करुन न देता फसवणूक केली. हा प्रकार जानेवारी 2019 ते 15 एप्रिल 2021 या कालावधीत शिंदेवस्ती, मारुंजी येथे घडला. या प्रकरणातील आरोपीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

संजय मारोतराव फुलझले (वय 44, रा. बाणेर रोड, हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या मृत व्यक्तिचे नाव आहे. याबाबत मयूर ज्ञानेश्वर कुंभार (वय 28, रा. थेरगाव) यांनी सोमवारी (दि. 6) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांच्यासह दिलीप चव्हाण, शोभा राजू साळुंके, गुलाब नामदेव झारगड, आनंद भास्कर वाघमारे, मंदार अप्पासाहेब क्षीरसागर, मोहम्मद साकुर, पृ्थ्वीनाथ प्रभुनाथ यांची आरोपीने फसवणूक केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक अजित काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी आणि अन्य फसवणूक झालेल्या नागरिकांना स्वस्तात प्लॉट खरेदी करून देतो, असे आश्वासन दिले. त्यापोटी फिर्यादी यांच्याकडून चार लाख रुपये, दिलीप चव्हाण यांच्याकडून चार लाख रुपये, शोभा साळुंके यांच्याकडून दहा लाख रुपये, गुलाब झारगड यांच्याकडून दहा लाख एक हजार रुपये, आनंद वाघमारे यांच्याकडून सहा लाख 11 हजार रुपये, मंदार क्षीरसागर यांच्याकडून 25 लाख रुपये, मोहम्मद साकुर यांच्याकडून दहा लाख 51 हजार रुपये, पृथ्वीराज प्रभुनाथ यांच्याकडून दोन लाख 51 हजार रुपये असे एकूण 72 लाख 14 हजार रुपये टोकन म्हणून घेतले.

एवढे पैसे घेऊन आरोपीने प्लॉटचे खरेदीखत न करता ते पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरून सर्वांची आर्थिक फसवणूक केली.

दरम्यान, एप्रिल 2021 मध्ये आरोपीला कोरोनाची लागण झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या फसवणुकीच्या प्रकरणातील पैसे कुणी वापरले, आणखी ज्यांचा सहभाग आढळेल त्यांना यात आरोपी केले जाणार आहे. हा तपासाचा भाग असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजित काकडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.