Pune News : कोंढवा खुर्द येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई

एमपीसी न्यूज – कोंढवा खुर्द येथील अनधिकृत बांधकामावर पुणे महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. पालिकेच्या झोन क्र. 2 मधील येथे 15 हजार 196 चौ. फुट. क्षेत्र मोकळे करण्यात आले. महाराष्ट्र महानगर अधिनियम कलम 53 (1) अन्वये सर्वांना नोटीस देऊन कारवाई करण्यात आली.

कारवाईमध्ये स.नं. 38/2/1/1 पोकळे मळा संघ मित्र सोसायटी येथील सुनील जाधव यांचे 1,320 चौ. फुट , शंकर जाधव यांचे 260 चौ. फुट, सोहेल बागवान यांचे 260 चौ. फुट, जुबेर शेख यांचे 190 चौ. फुट, सरफराज व युनुस मुफ्तारे यांचे 160 चौ. फुट, मनोरमा गायकवाड यांचे 520 चौ. फुट, शकील मौलवी यांचे 200 चौ. फुट, अल्ताफ शेख यांचे 70 चौ. फुट, अब्बास अतकार यांचे 660 चौ. फुट, शंकर जाधव यांचे 260 चौ. फुट, समीर पठाण यांचे 96 चौ. फुट, साजिद शेख यांचे 1,600 चौ. फुट, आरिफ मुल्ला यांचे 1,600 चौ. फुट, नदीम खान यांचे 8,000 चौ. फुट असे एकूण 15 हजार 196 चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

दोन जेसीबी, 1 ब्रेकर, 1 गॅस कटर, 1 जो क्रशर मशीन, बिगारी व पोलीस कर्मचारी यांचे सहाय्याने पूर्ण करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.