Pimpri News: ऑटो क्लस्टर, बालनगरीतील कोविड सेंटरचे काम तातडीने पूर्ण करा- महापौरांच्या सूचना

कोरोना सेंटरच्या कामाची आज (शुक्रवारी) महापौर ढोरे, सत्तारुढ पक्षनेते ढाके यांनी पाहणी केली. : Complete the work of Auto Cluster, Kovid Center in Balnagari immediately - Mayor's instructions

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. वाढत्या रुग्णसंख्येसाठी बेडची संख्या कमी पडत आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सेंटर आणि भोसरी येथील बालनगरी येथे तयार करण्यात येत असलेल्या कोविड केअर सेंटरचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महापौर उषा ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

कोरोना सेंटरच्या कामाची आज (शुक्रवारी) महापौर ढोरे, सत्तारुढ पक्षनेते ढाके यांनी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त अजित पवार, उपायुक्त अजय चारठणकर उपस्थित होते.

ऑटो क्लस्टर आणि भोसरीतील बालनगरी हे शहराच्या मध्यभागी येत असल्याने कोरोना रुग्णांसाठी या जागा सोयीच्या होणार आहेत.

यामुळे ऑटो क्लस्टर सेंटरमधील दोन मोकळ्या हॉलमध्ये 50 आयसीयू व 150 हायर ऑक्सीजन बेडची उभारणी करण्यात येत आहे.

तसेच बालनगरी येथे 400 सीसीसी बेडची उभारणी सुरु असून 4 दिवसात हे काम पुर्ण होईल. त्या ठिकाणी रुग्णांवर उपचार सुरु होणार आहेत.

पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात असणाऱ्या 30 आयसीयूसाठी गुरुवारपासून ऑक्सीजन सिलेंडरमार्फत पुरवठा चालू करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे वायसीएम रुग्णालयांमध्ये मुबलक प्रमाणात ऑक्सीजन पुरवठा उपलब्ध होण्यासाठी वायसीएम रुग्णालयाच्या परिसरात नव्याने 20KL ऑक्सीजन टँकची उभारणी केली जात आहे.

या ऑक्सीजन टँक प्रकल्पाच्या निर्मितीमुळे रुग्णालयामध्ये कायमस्वरुपी ऑक्सीजन/ आयसीयू बेडसाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध होणार आहे.

हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देखील महापौर ढोरे व सभागृह नेते ढाके यांनी प्रशासनाला दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.