Pimpri corona Update : कोरोना जातोय ! शहरातील रुग्णसंख्या शंभरच्या आत, आज 97 रुग्णांची नोंद

161 जणांना डिस्चार्ज, चार जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – गेल्या अनेक दिवसांनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्या शंभरच्या आतमध्ये आली आहे. शहराच्या विविध भागातील 97 आणि पालिका हद्दीबाहेरील 1 अशा 98 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 88 हजार 678 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 161 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 4 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात जुनी सांगवीतील 85, 45 वर्षीय दोन पुरुष, काळेवाडीतील 70 वर्षीय पुरुष आणि निगडीतील 69 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 88 हजार 678 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 85 हजार 374 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1544 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 639 अशा 2183 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 790 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 757 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.