Pimpri News : आकुर्डी येथे साफसफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाचे वाटप

एमपीसी न्यूज – आझमभाई पानसरे युवा मंच व स्विकृत प्रभाग सदस्य सुनिल कदम मित्र परिवार यांच्या वतीने साफसफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या आकुर्डीतील कै. वसंतदादा पाटील शाळेत पार पडला. तसेच यावेळी मेघराज कसबेकर, अजित शेट्टी, गणेश गुरव, स्वप्निल मवाळ, विजय शर्मा, शुभम सटाले, सागर अहिरे आदी उपस्थित होते.

यावेळी सुनिल कदम म्हणाले की, सफाई कामगार हे आज शहरातलं सगळ्यात मोठं काम करत आहेत, आझमभाई पानसरे यांनी सफाई कामगारांसाठी चांगला उपक्रम राबवण्याचा संदेश दिला होता त्याप्रमाणे आम्ही सगळे आज हा उपक्रम राबवत आहोत.    या सफाई कामगारांना दिवाळी भेट देत आहोत. असे सांगत सर्व कामगारांना दिवाळीच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन रॉयल ग्रुप व सिद्धार्थ नवरात्र महोत्सव मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.