Pimpri News : पांडुरंग भांडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस झोपडपट्टी सेलच्या कार्याध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज – पांडुरंग भांडेकर यांची पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस झोपडपट्टी सेलच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 21 जानेवारी रोजी ही निवड करण्यात आली.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष उत्तम हिरवे यांनी त्यांनी नियुक्तीचे पत्र दिले. पांडुरंग भांडेकर यांनी समाजात केलेल्या विविध समाजपयोगी उपक्रम आणि जनजागृतीचे कार्यक्रम लक्षात घेता त्यांना हि जबाबदारी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.