Maval News: दुसऱ्या टप्प्यातील नळ पाणी पुरवठा योजनां संदर्भात आमदार शेळके यांची आढावा बैठक

एमपीसी न्यूज: नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी जल जीवन मिशन अंतर्गत पहिल्या टप्प्यात 20 पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत तर पुढील काळात राबविण्यात येणाऱ्या 40 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी आमदार शेळके यांनी ग्रामपंचायत प्रतिनिधी व ग्रामसेवक व अधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक घेतली.

मावळातील ग्रामीण भागातील गावे व वाड्या-वस्त्यांवरील नागरीकांची पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण थांबावी आणि माता-भगिनींच्या डोक्यावरील हंडा खाली उतरविण्यासाठी प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी मागील दोन वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून पहिल्या टप्यातील 27 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून या 27 नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामास सुरवात देखील करण्यात आली आहे.

तालुक्यातील उर्वरित गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशनच्या दुसऱ्या टप्यातील 40 नळ पाणी पुरवठा योजनांना तत्वतः मान्यता मिळाली असून, प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, जागेची उपलब्धता, ठराव व इतर प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी सोमवारी (दि.7) वडगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे ग्रामपंचायत प्रतिनिधी, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेतली.

यावेळी नळ पाणी पुरवठा योजनांची प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत प्रतिनिधी, ग्रामसेवक यांनी त्यांच्या गावातील उर्वरित बाबी लवकरात लवकर गांभीर्यपूर्वक पुर्ण करुन घ्याव्यात. व अधिकाऱ्यांनीही पाठपुरावा करुन तात्काळ पुढील कार्यवाही करुन घ्यावी,अशा सुचना आमदार शेळके यांनी दिल्या.

यावेळी गटविकास अधिकारी सुधीर भागवत, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायण ठाकर, उपअभियंता अरविंद चाटे, शाखा अभियंता जयदीप अग्निहोत्री, रितेश मुंडे, रूपाली मोहारले, कल्पेश मराठे, मयूर झोडगे, ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी, ग्रामसेवक आदी.उपस्थित होते.

https://youtu.be/E3jTgxKBl8g

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.