Pimpri News: ‘महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ‘स्पर्श’च्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करा’

युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – एकाही रुग्णांवर उपचार न करता 5 कोटी 26 लाखांची बिले सादर करून महापालिकेची फसवणूक करणारे स्पर्श हॉस्पिटलचे सीईओ डॉ. अमोल होळकुंदे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी युवक काँग्रेसने पोलिसांकडे केली आहे.

याबाबत युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल यांनी पिंपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.

त्यात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक खासगी हॉस्पिटलला कोविड सेंटर सुरू करण्याबाबत महापालिकेने निर्देश दिले होते.

_MPC_DIR_MPU_II

सध्या कोविड सेंटरची बिले अदा करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये स्पर्श मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेला एकाही रुग्णांवर उपचार न करता तसेच महापालिका अटी-शर्तीची पूर्तता न करता त्यांनी 5 कोटी 26 लाखाची बिले महापालिकेला सादर केली आहेत.

पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने महापालिकेचे कोट्यवधी रुपये लाटण्याच्या उद्दिष्टाने ही बिले सादर करण्यात आली आहेत.

एकही रुग्ण नसताना महापालिकेस कोट्यवधीची बिले सादर करणारे डॉ. अमोल होळकुंदे यांनी महापालिकेच्या आर्थिक फसवणुकीच्या उद्दिष्टांनी ही बिले सादर केलेली आहेत. त्यामुळे डॉ. हळकुंदे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.