Pimpri News: नदी पात्रामध्ये राडारोडा टाकणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात पवना नदी सुमारे 32 किमी क्षेत्रातून वाहते. या नदीचा बहुंताश प्रवाह पिंपरी कॅम्प ,पिंपरीगाव या परिसरात आहे. पूर्वीच्या प्रभाग क्र.21मध्ये काही रस्त्यांचे कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. या कामामधून निघणारा डबर,राडारोडा,संबधित ठेकेदार पर्यावरणाचे नियम न पाळता थेट नदीत टाकत आहेत. त्यामुळे आधिच प्रदूषित झालेल्या पवना नदीत आणखी प्रदूषण होत आहे. तसेच राडारोड्यामुळे नदीचे पात्रही अरुंद होत चालले आहे. संबधित ठेकेदारावर तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटील व पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

Watch on Youtube: ऐकाआजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट! ऐका पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ठळक बातम्या

वाघेरे यांनी म्हटले आहे की, पिंपरी परिसरात प्रभाग क्र.21 मध्ये तसेच पिंपरीगावाच्या काही भागात सध्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्याचे काम सुरु आहे. हे काम जे.पी.एन्टरप्रायजेस या ठेकेदारास मिळाले असून संबंधित ठेकेदार व अधिकारी कॉंक्रीटीकरणाचे हे काम करीत असताना पर्यावरणाचे प्रदूषण न होण्याचे सर्व नियम,कायदे धाऱ्यावर बसून मनमानीपणे रस्त्यातून निघणाऱ्या राडारोडा,डबरचे योग्य नियमांनुसार विल्हेवाट न लावता महापालिकेला तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला फसवण्याचे काम करत आहेत.

महापालिकेच्या पर्यावरण विभागाने नदीप्रदुषण रोखण्यासाठी राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी नियमावली तयार केलेली असून संबंधित ठेकेदार हा अधिकाऱ्यांशी संगनमत करून महापालिकेने बनविलेल्या नियमावलीचा राजरोसपणे भंग करीत आहे. ही अत्यंत गंभीर स्वरुपाची बाब असून महापालिकेने याची तत्काळ दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून काळ्या यादीत टाकण्यात यावे,अशी मागणी वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटील व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही केली आहे.

Watch on Youtube: काऊंटडाऊन दहावी! भाग 8 : दहावीच्या भूगोलातही मिळवा भरभरून मार्क स्मिता करंदीकर

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.