Maval Corona News : नवीन 03 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात बुधवारी (दि.09 ) 03 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला , तर तालुक्यात दिवसभरात 02 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 18 आहे.

शहरी भागात 03 रूग्ण तर ग्रामीण भागात एकही रूग्ण आज सापडला नाही. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 02 रूग्ण सापडले, तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 01 रूग्ण आज सापडला आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत एकही रूग्ण सापडला नाही.

Watch on Youtube: ऐकाआजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट! ऐका पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ठळक बातम्या

तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 32,035 झाली आहे. तर दिवसभरात 02 रुग्ण बरेझाल्याने घरी सोडण्यात आले. बुधवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात एकही रूग्ण सापडला नाही.
31,492 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Watch on Youtube: काऊंटडाऊन दहावी! भाग 8 : दहावीच्या भूगोलातही मिळवा भरभरून मार्क स्मिता करंदीकर

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 11,035 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 5,092 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,555 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 17,682 रुग्ण तर ग्रामीण भागात 14,353 रुग्ण आढळून आले आहेत.
एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही.कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.03 टक्के आहे तर मृत्यू दर 1.64 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 15 लोणावळा नगरपरिषदमध्ये 01वडगाव नगरपंचायतमध्ये 00 ग्रामीण भागात 02असे एकूण 18 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

Watch on Youtube: प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख | पाहा फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो प्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.