Maharashtra Corona Update : कोरोना संसर्ग ओसरतोय! आज 0 मृत्यू, राज्यात 3,009 ॲक्टिव्ह रुग्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज दिवसभरात 359 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, शून्य मृत्यू झाले आहेत. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्या 3,009 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार, आजवर 78 लाख 69 हजार 897 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 77 लाख 19 हजार 100 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज 559 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.08 टक्के आहे.

Watch on Youtube: ऐकाआजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट! ऐका पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ठळक बातम्या

राज्यात आजवर 1 लाख 43 हजार 745 जण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. सध्या 27,116 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 604 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत 7 कोटी 84 लाख 19 हजार 100 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

Watch on Youtube: काऊंटडाऊन दहावी! भाग 8 : दहावीच्या भूगोलातही मिळवा भरभरून मार्क स्मिता करंदीकर

Watch on Youtube: प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख | पाहा फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो प्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.