Pimpri News : विविध संघटनांकडून कृषी कायद्यांची पिंपरीत  होळी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज: अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या तीनही कृषी कायद्यांची बुधवारी (दि. १३) पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात होळी केली.

या आंदोलनामध्ये माकप, इंदिरा कॉंग्रेस, बारा बलुतेदार, नागरी हक्क सुरक्षा समिती, डी वाय एफ आय, ओबीसी संघर्ष समिती, फेरीवाला क्रांती महासंघ, प्रहार जनशक्ती संघटना, स्वराज अभियान यासह अनेक संघटनांनी सहभाग घेतला.

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे, अनिल रोहम, गणेश दराडे, सलीम सय्यद, काशीनाथ नखाते, इब्राहिम खान, विशाल जाधव, संजय गायके, संदेश नवले, अजीजे शेख, शिवराम ठोंबरे, मनोज गजभार, आनंदा कुदळे, काळूराम गायकवाड, गौतम गजभार, प्रदीप पवार आदींनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

तसेच केंद्राच्या सुधारित तीनही कृषी कायद्यांची होळी केली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.