Pimpri news: न्यू सिटीप्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

एमपीसी न्यूज: रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटीप्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोशल डिस्टंसिन्ग पाळून साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, मुख्याध्यापिका आसावरी घोडके युवराज प्रगणे, सचिन कळसाईत तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

“राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंसारख्या महावृक्षाच्या सावलीत सावित्रीमाईंची वाढ खुंटली नाही, उलट अधिक बहरली. स्त्रीने ठरविले तर तिच्यासाठी काहीही अशक्य नाही, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावित्रीमाई फुले होय. सावित्रीमाई धाडसाचा पर्वत होत्या. त्यांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या निधनानंतरही सत्यशोधक समाजाचे कार्य आपल्या अंतापर्यंत सुरु ठेवले. आयुष्यातील सर्व संकटांना त्यांनी निर्धाराने हरविले आहे. सावित्रीमाईंच्या त्यागाची महिलांनी जाण ठेवावी ” असे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी म्हटले.

महाराष्ट्र शासनातर्फे यावर्षी पासून 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. म्हणून “सावित्री उत्सव”शाळेत साजरा केला. शाळेमध्ये ऑनलाईन पद्धतीने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी सर्व शिक्षकांचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याच बरोबर शाळेतील शिक्षकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. तन्मय इंगळे व देवयानी काटे यांनी सूत्रसंचालन केले व प्रीती गुप्ता यांनी पाहुण्याचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.