Sangvi News : सांगवीतील मजूर अड्ड्यावर पथनाटयातून ओमायक्राँन वर जनजागृती

एमपीई न्यूज : ओमायक्राँनच्या विळख्यात संपूर्ण जग सापडत चालले आहे.नवनवीन ओमायक्राँनचे सारखे व्हेरीयंट येत आहेत, यामुळे जगाची धास्ती वाढली आहे.कोरोना पेक्षा सहा पटीने ओमायक्राँन आधिक वेगाने वाढत आहे. देशात ओमायक्राँनचे जवळपास 1400 रुग्ण आहेत तर महाराष्ट्रत 460 रुग्ण आहेत.

राज्यात सध्या कोरोना बाधितांचा आकडा दहा हजारा जवळ गेला आहे.याचे गांभीर्य ओळखून दिलासा संस्था व मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने सांगवीतील मजूर अड्ड्यावर पथनाटयातुन,स्लोगन,स्पीकरद्धारे, अशिक्षित मजूरांचे ओमायक्राँन बाबत प्रबोधन करण्यात आले.

मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी आपल्या शर्टवर घातक कोरोनाचे चित्र काढून, नियम पाळा,ओमायक्राँन टाळा.,माझे आरोग्य, माझी जबाबदारी. घाबरु नका, जागरूक रहा. ओमायक्राँनची थांबवा साथ, वारंवार धुवा आपले हात. माझा मी रक्षक असे लिहिले होते आणि स्पीकरद्धारे जोगदंड नागरिकांना आव्हान करीत होते.

दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक मजूरांना मास्क घालण्याचे,वारंवार हात धुण्याचे,वारंवार  सँनीटाझरचा वापर करून गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करीत होते. सांगवी पिंपळे गुरव डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रदिप नन्नवरे यांनी ओमायक्राँन होऊ नये म्हणून घ्यावयाची दक्षता व झाल्यावर घ्यावयाची काळजी यावर मजूरांना माहिती दिली.

मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे संस्थापक अध्यक्ष विकास कुचेकर यांनी कोणताही आजार झाल्यावर घरी उपाय न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेण्याचे आवाहन केले आपली व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घ्यावी.

पथनाटयामध्ये शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक,प्रकाश घोरपडे,पंकज पाटील, मुरलीधर दळवी, विजया नागटिळक, शामराव सरकाळे यांनी सहभाग घेतला. यावेळी 500 मास्कचे मजूरांना वाटप करण्यात आले. पथनाटय सादरीकरण झाल्यावर कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम राष्ट्रगीत म्हणून झाली.

यावेळी संस्था अध्यक्ष विकास कुचेकर,शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक,सांगवी पिंपळे गुरव डॉक्टर्स असोसिशनचे अध्यक्ष डॉ प्रदिप नन्नवरे, डॉ कैलास पाटील,  पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष संगिता जोगदंड,  मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार,पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष मीना करंजावणे, उपाध्यक्ष विकास शहाणे, हनुमंत पंडीत, वसंत चकटे, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के, ऋतुजा जोगदंड, प्रकाश बंडेवार एकनाथ उगले,डॉ पी एस आगरवाल,शरद शेजवळ,विनायक विसपुते हे कार्येकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी केले तर आभार श्रीकांत चौगुले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.