Pimpri News: महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर पुन्हा आठ दिवस रजेवर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर( Shravan Hardikar)  हे बुधवार (दि.27) पासून पुन्हा आठ दिवसांच्या रजेवर ( Leave) जात आहेत. डिसेंबर अखेर आयुक्त आठ दिवसांच्या रजेवर होते. परत आयुक्त रजेवर जात असून त्यांना बदलीचे वेध लागले आहेत. बदलीसाठीच (Transfer) आयुक्त रजेवर चालले असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

पुणे विभागीय जात पडताळणी समितीची जबाबदारी असलेले अजित पवार ( Ajit Pawar)  यांच्याकडे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदाचा ‘अतिरिक्त पदभार’ ( Additional Charge) आहे. त्यांची मूळ आस्थापना जात पडताळणी विभागात आहे.

त्यामुळे महापालिकेतील तीनही अतिरिक्त आयुक्तांची पदे रिक्त आहेत. त्यातच आयुक्त श्रावण हर्डीकर पुन्हा आठ दिवसांच्या रजेवर जात आहेत. त्यामुळे निर्णय प्रक्रिया थंडावणार आहे.

श्रावण हर्डीकर यांची पिंपरी महापालिकेत पावणे चार वर्ष पूर्ण झाली आहेत. नुकतीच त्यांची सचिवपदी बढतीही झाली आहे. त्यामुळे त्यांना बदलीचे वेध लागले आहेत.

सत्ताधारी भाजप विरोधात जावू लागल्याने त्यांनी पुन्हा बदलीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. रजा कालावधीतच आयुक्तांची बदली होईल, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, रजा कालावधीत आयुक्त हर्डीकर यांच्याकडील पदभार पीएमआरडीचे आयुक्त सुहास दिवसे ( PMRDA Commissioner (Suhas Divse) यांच्याकडे दिला जावू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.