Pimpri news: माथाडी मंडळावर पिंपरी-चिंचवडमधील तिघांना संधी

कामगार नेते इरफान सय्यद, प्रवीण जाधव पिंपरी- चिंचवड तर पुणे माथाडी मंडळावर परेश मोरे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – माथाडी व असंरक्षित कामगार मंडळावर पिंपरी-चिंचवड शहरातील तिघांना संधी मिळाली आहे. पिंपरी-चिंचवड मंडळावर कामगारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष, खेड-आळंदी, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद आणि प्रवीण जाधव तर पुणे माथाडी मंडळावर परेश मोरे यांची नियुक्ती झाली आहे. याबाबतचे आदेश राज्याचे उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार यांनी काढले आहेत.

महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या माध्यमातून इरफान सय्यद, प्रविण जाधव, परेश मोरे माथाडी कामगारांसाठी लढतात. तिघेही एकाच संघटनेत काम करत आहेत. संघटनेचे कामगारांचे मोठे जाळे आहे. पश्चिम महाराष्ट्रात संघटनेचे कार्य आहे. माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी तिघेही लढत आहेत. कामगारांना न्याय मिळवून देत आहेत. संघटनेची धुरा भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष, खेड-आळंदी, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख, कामगार नेते इरफान सय्यद यांच्या खांद्यावर आहे.

तर, कार्याध्यक्ष परेश मोरे, जनरल सेक्रेटरी पदाची जबाबदारी प्रविण जाधव यांच्याकडे आहे. तिघांचीही माथाडी मंडळावर वर्णी लागली आहे. माथाडी कामगारांकडून त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले जात असून अभिनंदन करण्यात आले आहे. माथाडी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे राज्य शासनाकडून कामगारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कामगार नेते इरफान सय्यद, प्रवीण जाधव यांची नियुक्ती झाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, कामगार नेते शशिकांत शिंदे, दशरथ पिसाळ, धैर्यशील मांढरे, गोरख मेंगडे यांची वर्णी लागली आहे.

मंडळाचे अध्यक्ष मुंबई विभागाचे कामगार उपायुक्त बाळासाहेब वाघ आहेत. दरम्यान, पुणे माथाडी मंडळावर महाराष्ट्र मजदूर संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे यांची नियुक्ती झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III