Satara News : उदय सामंत यांची शिवसेनेचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती

एमपीसी न्यूज – उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी शिवसेनेच्या वतीने संपर्क मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

सामंत हे सध्या पिंपरी-चिंचवडचे संपर्क प्रमुख म्हणून काम करतात. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही नियुक्ती केली आहे.

दरम्यान, सामंत यांच्या निवडीने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III