Pimpri News: पिंपरी-चिंचवडचा दहावीचा निकाल 99.92 टक्के; 14 विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल आज (शुक्रवारी) जाहीर झाला असून पिंपरी-चिंचवड शहराचा 99.92 टक्के निकाल लागला आहे. 14 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासात प्रथमच परीक्षा परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांचे दहावीचे मूल्यांकन त्यांच्या अंतर्गत मूल्यमापन अधिक नववीचा वार्षिक परीक्षेचा निकाल या आधारे करण्यात आले आहे.

शहरातील 19 हजार 371 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. त्यातील 19 हजार 357 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा शहरातील 19 हजार 373 विद्यार्थी दहावीला होते. त्यातील 19 हजार 371 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता.

यामध्ये 10 हजार 325 मुले तर 9 हजार 46 मुलींचा समावेश होता. मुलांचे पास होण्याचे प्रमाण 99.89 टक्के आणि मुलींचे पास होण्याचे प्रमाण 99.96 टक्के आहे. तर, 14 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 11 मुले, 3 मुलींचा समावेश आहे. लेखी आणि अंतर्गत परीक्षा न दिलेले, तसेच वर्षभर शाळे्त न आलेल्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.