Pimpri News: उल्लेखनीय कामगिरीनिमित्त प्रफुल्ल पुराणिक यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजप्रबोधन पर्वाचे नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केले. त्यामुळे समाज प्रबोधनाचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला, असे गौरवोद्गार महापौर माई ढोरे यांनी व्यक्त केले.

महापालिकेच्या वतीने पाच दिवसांच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाज प्रबोधनपर्वाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

भाजप शहराध्यक्ष ,आमदार महेश लांडगे, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसद्स्या अपर्णा डोके, अनुराधा गोरखे, माधवी राजापुरे, सुवर्णा बुर्डे, अश्विनी जाधव, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने नुकतेच निर्देश दिले होते.

सदर निर्देश प्राप्त होताच माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी त्या अनुषंगाने तात्काळ एका दिवसात कार्यवाही करीत शालेय विद्यार्थाच्या निबंध ,वकृत्व स्पर्धा,रांगोळी प्रदर्शन, एकांकिका,एकपात्री नाट्यप्रयोग इत्यादी विविध कार्यक्रमांसह समाजप्रबोधन पर्वाचे यशस्वी आयोजन केले. याबद्दल त्यांना पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.